Breaking News

अतिक्रमणे काढून टाकण्याच्या विखे यांनी दिल्या सूचना


शिर्डी प्रतिनिधी

शिर्डी आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पाहणी केली. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करतानाच साठलेल्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ही अतिक्रमणे काढून टाकण्याच्या सूचना विखे यांनी अधिकार्‍यांना दिल्या. 

गुरुवारी संध्याकाळी शिर्डी आणि परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले. अतिक्रमणामुळे पाण्याला मोकळी वाट मिळाली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी थेट रहिवाशांच्या घरात शिरले. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. या सर्व परिस्थितीची पाहणी विरोधी पक्षनेते विखे यांनी संबंधित अधिकार्‍यांसह केली. प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, तहसीलदार माणिकराव आहेर यांनी पाहाणी केली. या पाहणी दरम्यान झालेल्या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न समोर आला.