Breaking News

आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा


।संगमनेर / प्रतिनिधी।

संगमनेर महाविद्यालयात दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी या कार्यक्रमाची सुरुवात महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी डॉ. अनिरुध्द मंडलिक यांनी आपल्या सुमधूर आवाजात योगसाधनेची सार्वभौम प्रार्थना सादर करुन तिचा अर्थ विषद केला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी उपस्थित योगसाधकांना योगसाधनेची शपथ व संकल्प दिला. तणावमुक्त आनंदी व शांततेने जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येकाने नियमित योगा करावा, असे आवाहन प्राचार्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.