Breaking News

आनंदऋषी संस्कारनिकेतनच्या अध्यक्षपदी गांधी


आश्वी : प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतलाल गांधी यांची लोणी (ता. राहता) येथील राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी महाराज संस्कार निकेतनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

त्याचप्रमाणे लोणी येथील राजेंद्र बोरा यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. जैन साध्वी कंचनकंवर महाराज यांच्या प्रेरणेने लोणी- प्रवरानगर येथे सुरु असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी महाराज संस्कारनिकेतनच्या विश्वस्त मंडळाची बैठक जैन साध्वी पू श्री. कंचनकंवर महाराज यांच्या उपस्थितीत नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथे पार पडली.