Breaking News

काळे घराण्याचे शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान : सिनेअभिनेते अनासपुरे


कोपरगाव ता. प्रतिनिधी
प्रत्येक घराण्याचा एक इतिहास असतो. अशा घराण्यांनी समाजासाठी खूप मोठ काम केलेलं असत. असच काम युवा नेते आशुतोष काळे यांच्या घराण्याने केले आहे. त्यांचे आजोबा माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देऊन खूप मोठे समाजकार्य केले आहे, असे गौरवोदगार प्रसिद्ध सिनिअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योगसमुहाच्यावतीने १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे होत्या. 

यावेळी बोलतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे म्हणाले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्यावतीने दरवर्षी १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. परंतु यावर्षी एक वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सत्कार सोहळा केला. नाम फौंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे केलेले काम करत आहेत. देशसेवेपेक्षा हे काम निश्चित कमी नाही.

याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सूर्यभान कोळपे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गोरक्षनाथ जामदार, डॉ. क्षत्रिय जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, शहर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदिप पगारे नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, नवाज कुरेशी, अर्जुनराव काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, चारुदत्त सिनगर, स्वप्नजा वाबळे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.