Breaking News

प्लॉस्टिक बंदीचा पहिल्याच दिवशी उडाला बोजवारा

मुंबई - राज्य सरकारने पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुंबईसह राज्यात प्लॉस्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिल्या दिवशी या निर्णयाचा बोजवारा उडाल्याचे चित्र मुंबईत ठिकठिकाणी पाहायला मिळाले. मुंबईसह राज्यात प्लॅास्टिक बंदी आजपासून लागू क रण्यात आली आहे. मुंबईतील बाजार मंडई, मच्छी मार्केटमध्येदेखील काही प्रमाणात प्लॉस्टिक बंदीचा परिणाम जाणवत आहे. मात्र जोगेश्‍वरी भाजी मंडईत व मच्छी मार्केटमध्ये प्लॉस्टिक बंदीनंतरही नागरिक किरकोळ स्वरुपाचे सामान घेण्यासाठी सरास प्ल ॅास्टिक पिशव्याचा वापर करताना पहायला मिळत आहेत. प्लॅास्टिक बंदीचे उल्लंघन करणार्‍याला 5 ते 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद केली आहे. मात्र या दंडाची फारशी फिकीर न करता अनेक नागरिक नेहमीप्रमाणे सामान खरेदी करण्यासाठी प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले.
पावसाळ्यात प्लॉस्टीक पिशव्यांमुळे गटारी तुंबत असल्याने प्लॅास्टीक बंदीचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजीमंडईतील व्रिकेत्याने अनेक ग्राहक खरेदीसाठी कापडी पिशव्या घेऊन येत असल्याचे सांगितले. पर्यावरण रक्षणाच्या राज्य सरकारने जाहीर केलेली प्लॅास्टिकबंदी आजपासून लागू झाली आहे. या बंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे सरक ारने जाहीर केले. प्रत्यक्षात प्लॅास्टिकचा वापर करणार्‍यांवर कितपत कठोर कारवाई होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घालण्यात आली आहे. 23 मार्च रोजी राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अधिसुचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपवण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत काल संपली.