पिंपरी महापालिकेची 52 जणांवर कारवाई
राज्य सरकारने आजपासून प्लॉस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिके च्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. शहरातील दुकाने, हॉटेलसह इतर आस्थापनावर धडक मोहीम राबवून आत्तापर्यंत 52 जणांविरोधात कारवाई करत 2 लाख 60 हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.