उमरगा परिसरात महिन्यात दुसर्यांदा अतिवृष्टी
उस्मानाबाद : उमरगा शहर व तालुक्यात या महिन्यात दुसर्यांदा अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टिने संपूर्ण तालुक्यात शेत- शिवारातील बांध फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. उमरगा, मुळज व नारंगवाडी मंडळ विभागात मोठा पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील जवळपास अडीचशे घरात पाणी घुसल्याने घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेत शिवारातून आलेल्या पावसाचे पाणी शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर साचल्याने रात्री दोन वाजल्यानंतर दोन तास वाहतूक ठप्प होती.