Breaking News

यंदा महाराष्ट्रात मान्सून कालावधीत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त - रामचंद्र साबळे

पुणे, दि. 03, जून - यंदा महाराष्ट्रात मान्सून कालावधीत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहील. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीच्या 102 टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ज्येष्ठ कृ षी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवला.महाराष्ट्रात मान्सून 5 ते 6 जूनपर्यंत दाखल होणार असून त्यानंतर 20 जूनर्यंत हा पाऊस राहील. मान्सून कालावधीत या वर्षी वार्‍याचा वेग क मी आढळल्याने जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही व परभणी येथे मोठे खंड पडतील. तसेच दापोली पाडेगाव, व नागपूर भागात खंडीत वृष्टी राहील.