Breaking News

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या पाच जणांवर कारवाई

सोलापूर, दि. 03, जून - बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्या, ग्लासचे उत्पादन करणार्‍या शहरातील पाच उत्पादकांवर प्रदूषण मंडळाने दंडात्मक कारवाई केली. पुन्हा उत्पादन करताना आढळल्यास मोठ्या कारवाईचा इशारा देण्यात आला. 

शासनाने 23 मार्चपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. चिंचोळी व अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीमध्ये प्लास्टिक पिशव्या, ग्लॉसचे उत्पादन सुरू होते. याबाबत माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे यांनी अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीमधील स्वामी समर्थ प्लास्टिक, आनंद प्लास्टिक, मजरेवाडी शांतीनगर येथील सदानंद प्लास्टिक, चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील सिद्धेश्‍वर प्लॅस्टिक, बालाजी प्लॅक्सो पॅकेजिंग यांच्यावर प्रत्येकी पाच हजार दंडात्मक कारवाई केली.