Breaking News

गौरी लंकेश हत्येप्रकरणी चिंचवडमधून अमोल काळेला अटक

पुणे, दि. 03, जून - गौरी लंकेश हत्येप्रकरणी चिंचवड येथून अमोल काळे या या संशियिताला विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) अटक केली आहे. बंगळुरुमधील आरआरनगरमध्ये 5 सप्टेंबर 2017 मध्ये घरासमोर गोळ्या झाडून गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधी लिखाण करणा-या गौरी लंकेश हत्या प्रकरण देशभरात चर्चेला विषय ठरले आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार यांच्या विरोधात एसआयटीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. त्याने गोळ्या झाडणा-यांना लंकेश यांच्या घरापर्यंत नेणे व मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात म्हटलेले होते. त्यानंतर या हत्येप्रकरणात अमोल काळे उर्फ भाईसाहब उर्फ संजय भन्सारे (39), अमित देगवेकर उर्फ प्रदीप महाजन (38), मनोहर येडावे उर्फ मनोज (28) या तिघांसह एकूण पाच संशयितांना एसआयटीने अटक केली. या अटकेनंतर लंकेश हत्या प्रकरणाचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आले आहे. अटक केलेल्या पाच संशयितांपैकी अमोल हा चिंचवडमधील मालिक कॉलनीतील अक्षय अपार्टमेंटमधील रहिवाशी आहे. तसेच, एसआयटीने अटक केलेले हे चार जण सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीशी संबधित असल्याचेही पोलिस यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.