Breaking News

बजाज पल्सरची चोरी


कोपरगाव शहर प्रतिनिधी :

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोडी, दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे. या घटनांचा तपास लागलेला नसताच येथील योगेश नरोडे यांची बजाज कंपनीची ४० हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी {क्र. एम. एच. १७ बी ५८३७ } चोरीला गेली. येथील सुखसागर अपार्टमेंट, सप्तर्षी मळा येथे २३ मी रोजी ही दुचाकी लावण्यात आली होती. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात चोऱ्या आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेबद्दल नागरिकांत नाराजी पसरली आहे.