Breaking News

खेडच्या ’लोकनायक’मध्ये कागदकामावर कार्यशाळा


कुळधरण / प्रतिनिधी । 
कर्जत तालुक्यातील खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात कागदापासुन विविध वस्तु बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्राचार्य चंद्रकांत चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रा. किरण जगताप यांनी प्रास्ताविकात उपक्रमाच्या आयोजनाचा हेतू सांगितला.जामखेडच्या तपनेश्‍वर गल्ली येथील सूर्यकांत कोकाटे यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. गेल्या 25 वर्षांपासुन ते महाराष्ट्रातील विविध विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कागद कलेचे शिक्षण देत आहेत. खेड येथे त्यांनी कागदापासुन विविध वस्तु तयार करण्याचे धडे दिले. कागदापासुन आकाश कंदील, टोपी, सीडी, गुलाबपुष्प आदी वस्तु तयार करुन दाखविल्या. अत्यंत सोप्या पध्दतीने कृती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. नाविन्यपूर्ण कृती व माहितीचे सादरीकरण होत असल्याने विद्यार्थ्यांनी उपक्रमास चांगलाच प्रतिसाद दिला. कोकाटे यांनी लिहिलेल्या कागदाची किमया या पुस्तकाचे वितरण व कागदापासुन तयार केलेले गुलाबपुष्प तसेच पुस्तक देवुन प्राचार्य चंद्रकांत चेडे तसेच विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मारुती सायकर, काशिनाथ सोनवणे, रुपचंद गोळे, मुगुटराव शेजाळ, तात्याराम गावडे, सुनील थोरात, पंकज काराळे, बाळासाहेब काळे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन कलाशिक्षक संदिप कदम यांनी केले. तात्याराम गावडे यांनी आभार मानले.


मराठी असल्याचा अभिमान
विविध वस्तु तयार करताना कोकाटे यांनी कृतीबरोबरच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. माणसाकडे कला असेल तर ते उदरनिर्वाहाचे साधन बनविता येते. कलाकारांसाठी कला हेच जीवन असते. कागदकामाच्या कलेत परप्रांतीय लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागात जावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळते याचा, अभिमान असल्याचे सुर्यकांत कोकाटे यांनी सुचित केले.