Breaking News

सुभाष कोकाटे यांना राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार

सिंधुदुर्गनगरी, दि. 11, जून - देवगड पंचायत समिती माजी सदस्य तथा फणसगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कनिष्ठ लिपिक सुभाष कोकाटे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव क ामगिरी बद्दल यूथ क्लब मुंबईच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ग्रामरत्न2018 हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 16 जून रोजी कोल्हापूर येथे होणा-या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
समाजसेवक सुभाष कोकाटे हे फणसगाव सारख्या ग्रामीण भागात कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करीत आहेत.सन 207 ला फणसगाव ग्रा.प.सदस्य, सन- 2009 ला फणसगाव विविध कार्यकारी सोसायटीतचे चेअरमन, सन- 2012 देवगड प.स.चे सदस्य म्हणून निवड, सन- 2013 ला पुन्हा वि. का. सोसायटी चेअरमनपदी नेमणूक, व सध्या आडिवरेकर उत्कर्ष मंडळ मुंबईचे सेक्रेटरी व फणसगाव माध्यमिक विद्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून गेली 22 वर्ष कार्यरत आहेत या विविध माध्यमातून फणसगाव परिसरात तळागाळातून निस्वार्थवृतीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून सर्वपरिचित आहेत.
त्यांच्या कित्येक वर्षाच्या कामगिरीची दखल घेत हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय ग्रामरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल सुभाष कोकाटे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.