...तर आपण मजुरांकडे जाऊ - धनंजय मुंडे
पुणे, दि. 11, जून - छत्रपतींच्या राज्यभिषेकाच्या दिवसी हेच भाजपवले छत्रपतींना विसरले आणि माधुरी दीक्षितकडे गेले तर आपण मजुरांकडे जाऊ. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणार्या सामान्य माणसाकडे जाऊ. ते कपिल देवकडे गेले तर आपण बळीदेवाकडे जाऊ, भाजपवाले छत्रपतींच्या राज्यभिषेकाचा दिवस विसरल्याची टीका विरोधीपक्षनेते धनंजय मुंढे यांनी केली. भाजपवर हल्लाबोल करताना मुंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या भाजपाला सहा जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाचाही विसर पडला आहे. शिवराज्याभिषेकाचा दिवस विसरून अमित शाह मुख्यमंत्र्यांसोबत माधुरी दीक्षितला भेटले. त्यांना यशाची पुस्तिका दाखवून काय साधलं? महागाई, दरवाढीची झळ त्यांना समजणार आहे का? शिवराज्यभिषेकास न जाता माधुरीच्या घरी गेलेल्यांना शिवरायांचा मावळा विसरणार नाही.
