स्मृती इराणींची नीती आयोगातूनही हकालपट्टी
चंदीगड - माहिती व प्रसारण विभाग हातून गेल्यानंतर स्मृती इराणींना आता दुसरा झटका बसला आहे. नीती आयोगातील विशेष आमंत्रित पदावरुन स्मृती इराणींना हटवण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास मंत्री असतानाच्या वेळेपासून स्मृती इराणी नीती आयोगाच्या सदस्य होत्या. मागील महिन्यात स्मृती इराणींना माहिती व प्रसारण मंत्रालयावरून काढून त्यांच्याऐवजी राज्यवर्धन राठोड यांना हे खाते देण्यात आले. इराणींकडे सध्या फक्त वस्त्रोद्योग मंत्रालय आहे. अलिकडेच स्मृती इराणींवर संसदीय निधीचा दुरुपयोग केल्याचे आरोप लावण्यात आले. हे गंभीर आरोप गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांनी लावले होते. चावडा यांनी आपल्या ट्विटद्वारे लिहिले होते, स्मृती इराणींनी आनंद जिल्ह्यातील माघरोल गाव मॉडेल विलेजसाठी दत्तक घेतले होते व त्यांनी या गावाला भ्रष्टाचार व सत्तेच्या दुरुपयोगाचे उत्तम मॉडेल बनवण्याचे काम केले.
