मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बबन झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्या हातातून रॉकेलची बाटली फेकल्याने पुढचा अनर्थ टळला.
झोटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास मरीन लाईन्स पोलीस करत आहेत. झोटे हे धुळे महानगरपालिकेत 1990 पासून शिपाई पदावर कार्यरत आहे. शासनाने त्यांना या सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, असे असतानाही काही अधिकारी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याने आज त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही सहावी घटना आहे. यापूर्वी 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती. तसेच तुरुंगातून पेरोलवर आलेल्या एका तरुणानेही मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मंत्रालयामध्ये जाळीदेखील लावण्यात आली होती. या कृतीविरोधात विरोधकांसह सामान्य नागरिकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली होती.