Breaking News

गुंडेगाव येथे दीपाली सय्यद-भोसले वृद्धाश्रम व अनाथालयाचे काम प्रगतिपथावर

वृद्धाश्रम ही काळाची गरज नाही. मात्र, मुलगी म्हणून वृद्धांची सेवा करण्याची संधी या वृद्धाश्रमातून मिळणार आहे. त्यासाठीच नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे दीपाली सय्यद-भोसले वृद्धाश्रम व अनाथालयाची उभारणी केली जात आहे. वृद्धाश्रमात कोणी जाऊ नये. मात्र, परिस्थितीपुढे प्रत्येकजण हतबल होतो. अशावेळी वृद्धाश्रम व अनाथालयाशिवाय पर्याय नाही. ही दोन्ही जीवन जगण्याचा अधिकार ठरतात, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केले.

नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बांधण्यात येत असलेल्या दीपाली सय्यद-भोसले वृद्धाश्रम व अनाथालयास सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भाऊसाहेब शिंदे, सरपंच संजय कोतकर, उपसरपंच सुनील भापकर, संजय सावंत, दादासाहेब आगळे, रामदास हराळ, सतीश चौधरी, सागर हराळ, तात्या भापकर, संतोष शिंदे, सुनील पवार, अ‍ॅड. निकम आदी उपस्थित होते. दीपाली सय्यद पुढे म्हणाल्या की, हे वृद्धाश्रम व अनाथालय उभारण्यासाठी भाऊसाहेब शिंदे यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर खर्‍या अर्थाने हे काम सुरू होऊ शकले.