सहलीच्या बसला अपघात, 3 ठार 22 जखमी
सातारा, 14 - पुणे ते बंगळुरुकडे जाणा़-या राष्ट्रीय महामार्गावर काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कॉलेजच्या पिकनिक बसची आणि उसाच्या ट्रॅक्टरची समोरा समोर धडक झाली.
यात तीन जण जागीच ठार झाले असून, 22 जण गंभीर जखमी आहेत. तासवडे टोलनाक्याजवळ रविवारी पहाटे ही भीषण दुर्घटना घडली. हे विद्यार्थी गोव्यावरून परतत होते. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. मृतांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अभिजीत पंडीत पेठकर, कॉलेजचे शिपाई सुर्यकांत सुदाम कानडे आणि गाडीचे क्लिनर प्रकाश बसवराज बिराजदार या तिंघाचा समावेश आहे.