Breaking News

पतसंस्थांसाठीच्या सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ

महाराष्ट्रातील नागरी व पगारदार सहकारी पतसंस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून नागरी व पगारदार सहकारी पतसंस्थासाठी सामोपचार परत फेड योजनेस मुदत वाढ देण्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि. 6 जून रोजी जाहीर केले आहे. शासन निर्णय क्र.सी.सी.आर आर 1106 /प्र. क्र.1/ पुर्नबांधणी /1/7/म या निर्णयाचे स्वागत असल्याचे फेडरेशनचे काका कोयटे यांनी म्हटले आहे.या निर्णयानुसार दि. 31 मार्च 2016 ची अनुत्पादक कर्ज धरण्याची कट ऑफ देट निश्‍चित केली आहे. त्याचप्रमाणे या कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली दाखला प्राप्त झाला आहे. अशाच कर्ज खात्यांना सदर योजनेचा लाभ देय राहील.