Breaking News

प्लास्टिकचा वापर करणा-यांकडून तब्बल 1 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल

पुणे, दि. 03, जून - नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, यासाठी महापालिकेतर्फे प्लॉस्टीक कॅरीबॅगचे उत्पादन, साठा, विक्री आणि वापरबंदी मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गेल्या दोन महिन्यात आठ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत प्लास्टिकचा वापर करणा-यांकडून तब्बल 1 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 45 हजार रुपये ’फ’ क्षेत्रिय कार्यालया मार्फत दंड वसूल करण्यात आला आहे. तर, मंडई, फेरीवाले, दुकानदारांकडून 2190 किलो ग्रँम प्लॉस्टिक कॅरीबँग जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने 23 मार्च रोजी घेतला. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील त्याची अंमलबजावणी सुरु केली.