Breaking News

भीमराज सिरसूल सेवानिवृत्त :भावपुर्ण निरोप



येथील जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक भीमराज सिरसूल हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 मे, 2018 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सिरसूल यांचे कुटुंबियही उपस्थित होते.

सिरसूल यांनी अहमदनगरसह नाशिक आणि जळगाव येथेही सेवा बजावली. वाहनचालक असतानाही त्यांनी कार्यालयाच्या सर्वच उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.
यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील सहकारी माहिती सहायक गणेश फुंदे, सुधीर पवार, संतोष गुजर, धनंजय जगताप, सुनीलदत्त शिवदे, रमेश उर्णे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सर्वांनीच सिरसूल यांनी बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल गौरवोद्गागार काढले.
निरोप देता वेळी त्यांनी विविध आठवणींना वाट मोकळी करुन दिली. त्याच्या कार्यकीर्दीतील आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या.