Breaking News

कराड अर्बन बँकेवर प्रशासक नेमावा : गोरख शिंदे

पुणे शाखेत वाहन कर्ज वितरणात लाखोंचा घोटाळा ; संचालक मंडळावर गुन्हे दाखल 
कराड : दि. कराड अर्बन को. ऑप.बॅकेच्या पुणे येथील बाजीराव रोड सदाशिवपेठ शाखेत वाहन कर्जे वितरणामध्ये लाखो रूपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या वाहन कर्ज घोटाळा प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सद्यस्थितीत बँकेवर प्रशासक नेमावा. व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्व सुखसोयी काढून घ्याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रक ार परिषदेत आपली भूमीका मांडली. 
या वेळी सामाजिक कार्यकर्ते शरद देव नागेश कुलकर्णी, अशोक पाटील यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. 
या घोटाळयाच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त पुणे यांनी दिले होते. त्या चौकशीत कर्जदार, बँकेचे वरीष्ट अधिकारी व बँकेचे संचालक मंडळ दोषी आढळले आहेत. त्यांच्या विरोधात पुणे विश्रामबाग पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. असे असताना पोलिस यंत्रणा संबंधितावर कारवाई करण्यास विलंब करत आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी संबधीतावर त्वरीत कारवाई करावी. या मागणीसाठी आम्ही पोलिस स्थानकासमोर आंदोलन छेडणार आहे. तसेच कराड अर्बनच्या कारभारची सभासदांना माहिती व्हावी म्हणुन ही अर्बनच्या कराड येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे धरणार असल्याची माहिती दिली. 
अधिक माहिती देताना शरद देव म्हणाले कराड अर्बन बँकेेची पुणे येथे शाखा आहे. या शाखेत सन 2008 साली लाखो रूपयांची वाहन कर्जे वितरीत करण्यात आली. सदर प्रकरणात कर्जदारांनी बोगस कागदपत्रे सादर के ली होती. वास्तविक कोणत्याही कर्जप्रकारणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची जबाबदारी संबंधीत बँक अधिकार्‍यांची असते. मात्र तेथील अधिकार्‍यांनी संबंधीत कर्जप्रकरणातील कागदपत्रांची शहानिशा केली नाही. सदरच्या कर्ज प्रकरणातील जामीनदारांची माहितीही घेतली नाही. व संबंधीत कर्जदारांना लाखो रूपयांची कर्जे वितरीत केली या कर्ज प्रकणास बँकसंचालकांनीही मंंजुरी दिली होती.
त्यामुळे चौकशी अधिकार्‍यांनी सदरची कर्ज प्रकरणे संगनमताने दिल्याचा आरोप निश्‍चित करून आयुक्तांना आपला आवाज सादर केला असता. संबंधित सर्व दोषींंंवर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. दरम्यान या प्रकरणी बँक व अधिकार्‍यांनी आपले म्हणने उच्च न्यायालयात सादर करून न्यायालयास गुन्हा नोंद करू नये असा आदेश होण्याची विनंती केली परंतु उच्च न्यायालयाने बँकेचा अर्ज फेटाळला त्यामुळे पुणे पोलिसात त्या प्रकरणी कर्जदार, बँक अधिकारी अर्बनच्या सर्व संचालक मंडळावर गुन्हा नोंद झाला आहे. परंतु आज तागायत पुणे पोलिस तपासाच्या नावाखाली संबंधीत दोषींवर पुढील कायदेशीर कारवाई करत नाहीत. तेंव्हा तपासी अधिकार्‍ंयानी ताबडतोबीने संबंधीत दोषींवर कारवाई करावी अन्यथा आम्हास संबंधित पोलिस स्थानकासमोर आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शरद देव यांनी देऊन कराड अर्बनच्या संचालकांचा कारभार  चव्हाटयावर आणण्यासाठी आम्ही कराड येथील बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. असेही सांगितले.