Breaking News

सर्वात मोठे निसर्गोपचार रुग्णालय पुण्यात होणार

पुणे, दि. 23, जून - राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेतर्फे (एनआयएन) लवकरच पुण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठे निसर्गोपचार रुग्णालय कोंढवा येथे होणार आहे. तसेच निसर्गोपचाराचा प्रसार व्हावा या हेतून नॅचरोपॅथी कॉलेजही सुरु केले जाणार असून त्यामध्ये गांधीयन स्टडी सेंटर देखील असणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्यलक्ष्मी यांनी दिली.राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही आयुष मंअंतर्गत निसर्गोपचार केंद्रआहे. येथे नैसर्गिक पद्धतींने पाणी, माती, वाळू, सूर्यकिरण, एक्यूपंक्चर, एक्युप्रेशरच्या माध्यमातून उपचार केले जातात. या नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रसार व्हावा यासाठी एनआयएनकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या अंतर्गतच आता कोंढवा येथे प्रशस्त रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 25 एकर जमीन घेण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास साडेचारशे कोटीचे अनुदान मिळाले आहे. या रुग्णालयाची क्षमता दोनशे बेड असून पाचशे बेडपर्यंत ती वाढविता येणार आहे. या रुग्णालयाचे काम सुरु झाले असून लवकरच ते कार्यान्वित होईल असेही त्यांनी नमूद केले.