Breaking News

मजलेशहर ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायतसाठी मागणी


शेवगाव / प्रतिनिधी ।
तालुक्यातील मजलेशहर येथील ग्रामस्थांनी आपल्याला नवीन ग्रामपंचायत मिळावी अशी मागणी शेवगाव पंचायतीमध्ये एका ठरावाद्वारे केली आहे.
शेवगाव तालुक्यामध्ये नवीन मजलेशहर व जुने मजलेशहर अशी गावी आहेत.
गोगलेगाव, खिर्डी, कपूर, कर्जत, निराळी, लिहा, जैतेवाडी, ढोरहिंगणी अशी धरण ग्रस्त गावे मिळून मजलेशहर या गावी 1972 ला पुनर्वसित झाली. आजमितीला मजलेशहर गावची लोकसंख्या 1987 आहे. शासन निर्णयानुसार या ग्रामपंचायतींना धरणग्रस्त म्हणून गावठाण तयार झाले व शासन परिपत्रकानुसार 350 लोकसंख्येनुसार नवीन ग्रामपंचायत स्थापनेसाठी ही संख्या पुरेशी आहे. असे ग्रामस्थांनी ठरवामध्ये नमुद केले. तशा आशयाचा ठराव मजलेशहर ग्रामपंचायतीमध्ये संमत करण्यात आला आहे.
या ठरावावर अलका मिसाळ (सरपंच मजलेशहर), शेषराव एव्हान ( माजी उपसरपंच मजलेशहर), नवनाथ सुखदेव कास ग्रामपंचायत सदस्य मजलेशहर), छगन केशव मुगुटमल (ग्रामपंचायत सदस्य मजलेशहर), संतोष विष्णू बोरुडे, संतोष प्रभाकर मुगुटमल, दिलीप केशव मुगुटमल, वसंतराव बोरुडे, आप्पासाहेब फटांगडे आदी ग्रामस्थांच्या या ठरावावर सह्या आहेत. तसेच या ठरावाला मजलेशहर ग्रामपंचायतीनेही 18 ऑगष्ट 2017 रोजी एक मुखाने संमती दिली. हा प्रस्ताव शेवगाव पंचायत समितीला 05 मार्च 2018 रोजी दाखल केला आहे. सदर प्रस्ताव जि. प. अहमदनगर यांना पुढील कारवाईसाठी सादर झालेला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा ठराव अडगळीत पडला असून लवकरात लवकर शासन स्तरावर, या बाबींचा पाठपुरावा करून मजलेशहर ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
1972 साली जायकवाडी प्रकल्पासाठी शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना आपली घरेदारे व जमिनी सोडून द्यावी लागले, शासनाने या जमिनी संपादित करून, नंतर होणारे ग्रामस्थांचे पुनर्वसन व ग्रामस्थांना दिल्या जाणार्‍या ( रस्ते, वीज,पाणी, शाळा, घरे, ) आदी देण्याचा निर्णय शासकीय परिपत्रकानुसार देणे क्रमप्राप्त आहे. परंतु आज शासकीय यंत्रणा या गोष्टींना कमी पडताना दिसत आहेत. तरी नवीन ग्रामपंचायत आली तर, नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळेल त्यासाठी मजलेशहर ग्रामस्थांना तत्काळ नवीन ग्रामपंचायत मंजूर व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.