Breaking News

गौरव समारंभासह करियर मार्गदर्शन मेळावा


पारनेर / प्रतिनिधी 
पारनेर येथे शनिवारी सकाळी 10 वाजता गायत्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थी व एम.पी.एस.सी मधील गुणवंतांचा गौरव समारंभ तसेच करियर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पारनेर येथील आनंद लॉनमध्ये करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पोपटराव पवार कार्याध्यक्ष समृध्द गाव योजना यांचेहस्ते व आ. विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.पारनेर राहुल झावरे सभापती, जि.प.सदस्य काशिनाथ दाते, प्रांत अधिकारी गोविंद दाणेज, तहसीलदार भारती सागरे, गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे, डॉ. आर.जी. सय्यद हे असणार आहेत. तसेच पारनेर तालुक्यातून नुकतीच पी.एस.आय.पदी नियुक्ती झालेले दीपाली बबन येणारे, सोमनाथ खंडू लाळगे, अमोल किसन गुंजाळ, सविता गोरख काळे, यांचा सत्कार होणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या करियर मार्गदर्शन मेळाव्यास तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गायत्री कॉम्प्यूटरचे संचालक इंद्रजित देशमुख यांनी केले आहे.