Breaking News

चिंचवणे घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा


अकोले / प्रतिनिधी । 
राजूर-चिंचवणे रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढून व ते स्वीकारूनही संबधित ठेकेदाराने अद्याप काम सुरू केले नसल्यामुळे या भागात जाणार्‍या बस बंद झाल्या असून, त्यामुळे विध्यार्थ्यांना कॉलेजला येण्यासाठी बस नसल्याने शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे म्हणून शेलद, चिंचवणे ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही व आजपर्यंत 10 अर्ज संबंधित विभागाला देवूनही अद्याप काम सुरू न झाल्याने शेलदचे उपसरपंच एकनाथ यादव यांनी तहसीलदार काचेरीसमोर उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. तसे पत्रही देण्यात आल्याचे ते म्हणाले, सध्या या रस्त्यावर मोटरसायकल व टेम्पोचा अपघात होवून दोघे तरुण गंभीर जखमी होवून नाशिक येथे उपचार घेत आहेत.
या रस्त्याबाबत ठेकेदार जाजू यांच्याशी संपर्क साधला असता तातडीने रास्ता पावसाळ्यापूर्वी करून देतो तर, दुसरे ठेकेदार येवले यांनीही रास्ता पूर्ण करण्याचे आश्‍वासन देऊनही हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. त्यामुळे रस्त्यावरील मोर्‍या खराब होवून त्यात मोठा खड्डा असल्याने, मोठ्या गाड्या, बस जाणे अशक्य असल्याने हंस रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे, असे एकनाथ यादव यांनी सांगितले. त्यामुळे सोमवार पासून उपोषण करणार