Breaking News

व्हिडिओकॉन समूह कर्ज प्रकरणात सेबीचा प्राथमिक तपास पूर्ण


वृत्तसंस्था | नवी दिल्ली आयसीआयसीआय बँक आणि बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बाजार नियामक सेबीने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्ज प्रकरणाची प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. या तपास अहवलामध्ये व्हिडिआेकॉनला कर्ज देण्यात गडबडी झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओकॉन आणि कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या दरम्यान असलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती सार्वजनिक करताना चंदा कोचर यांनी बाजार नियमांचे उल्लंघन केले आहे.