Breaking News

श्‍वानानंतर आता बिबट्याची दहशत



शहरतील कायम गजबजलेल्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे असल्याचे येथील नागरीक सांगत असल्याने आता शहरात बिबट्या दिसल्याची चर्चाही सुरु झाली आहे.
बोरुडे मळ्यात गेल्या आठवड्यात अनेकदा बिबट्या दिसल्याचे चौकाचौकात चर्चा आहे. शनिवारी त्याने श्‍वानाला मारल्याचे आढळले असल्याचेही सांगण्यात आले. त्याच्या पायाचे सुस्पष्ट ठसेही दिसल्याने त्याच्या वक्तव्याची खात्री वनविभागालाही झाली आहे. तसेच निसर्गमित्र मंदार साबळे यांनी भेट दिली.
रविवारी सकाळी तेथे बिबट्या पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला. यातुन आता शहरात गेल्या मंगळवारी झालेल्या श्‍वानाच्या चाव्याची आणि बिबट्याची चर्चा सुरु आहे. सध्या शहरात बिबट्या आणि श्‍वनाची दहशत असल्याचे बोललेे जात आहे.
सदरचा परिसर अगदी शहराला लागून असल्याने बिबट्या नेमका कोणत्या भागातून आला याचाही सुगावा लावण्याने काम सुरु आहे. शहराच्या इतक्याजवळ बिबट्या दिसण्याची ही पहिली वेळ आहे. बहुधा पाण्याच्या शोधात तो आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या नंतर आता वनखात्याने पिंजरा लावला असून बिबट्या या भागात आहे की नाही हे मात्र समजलेले नाही.