Breaking News

उपजिल्हाधिकारी पदी प्रशांत पाटील

 

अहमदनगर ।नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी प्रशांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांपासून हे पद रिक्त होते. तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांची मुंबई येथे बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. कदम यांची बदली झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत हे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. आता पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्याला पुर्णवेळ निवासी उपजिल्हाधिकारी मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथे पाटील हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांची नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून तसा आदेश 1 जून रोजी देण्यात आला आहे.