महावितरणची दोन्ही तक्रार निवारण केंद्रे बंद
सोलापूर - विजेबाबतच्या तक्रारींसाठीचे येथील महावितरण कार्यालयाकडील दूरध्वनी सेवा असलेली दोन्ही केंद्रे बंद केली आहेत. याची ग्राहकांना माहिती नसल्याने अडचण होत आहे. त्यावरून शहरातील नागरिक आणि महावितरण कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. आता थेट लाइनमनशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. शहरातील वीजपुरवठा, तां त्रिक अडचणी, नादुरुस्ती याविषयीच्या तक्रार नोंदणी आणि तक्रार निवारणासाठी महावितरणने दोन केंद्रे सुरू केली होती. यात महावितरण कार्यालयातील 220372, उपकेंद्रातील 220856 हे दोन दूरध्वनी क्रमांक शहरवासीयांना देण्यात आले होते. वीज ग्राहक या दोन्ही क्रमांकांवर संपर्क साधायचे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हे दोन्हीही क्रमांक बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय वाढली आहे. याची माहिती नसल्याने त्यांना कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवावी लागत आहे. सध्या वादळी वार्यासह पावसात तांत्रिक बिघाड, तारा तुटणे आदी घटना घडल्यावर अडचण येत आहे. आता शहरवासीयांच्या तक्रारी वाढल्यावर थेट लाइनमनशी संपर्क साधण्यास सांगण्यात येत आहे. भागनिहाय लाइनमन, कंसात संपर्क क्रमांक : बसस्थानक, मौलाली माळ, घोलपनगर : बी एस. गायकवाड (7875820412), महिंद्र नगर : डी. एन. जगदाळे (7875820654), भवानी पेठ : एस. एन. घरबुडे (7030948704), कचेरी रोड, सिद्धार्थ नगर : बी. एस. पाटील (7875820257), राशिन पेठ, फुलसौंदर चौक : के. एस. वांढरे (7066030622), कुंकू गल्ली, खंदक रोड, पोथरे नाका : ए. एल. शेख (9765664272), देवीचामाळ रस्ता : टी. एस. वीर (9890310211), किल्ला विभाग, मंगळवार पेठ : व्ही. एस. लष्कर (9112800404), फंड गल्ली, रंभापुरा, कुंभारवाडा, मुथा नगर : बी. व्ही. भांडवलकर (9075536279). यावर संपर्क क रावा.