व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक
पुणे - चारचाकी वाहनांचा स्टॉक भरण्यासाठी पैशांची गरज आहे. असा बहाणा करून एका व्यावसायिकाची 50 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार ऑक्टोबर 2016 ते जून 2018 दरम्यान घडला. मनिल अशोक आचंतानी (वय 38, रा. गोल्ड कोसहोरी, बाणेर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पुनित वाधवानी (रा. 29) आणि राकेश राजपाल (वय 45, दोघेही रा. अमर रेनेसन्स, सोपानबाग, घोरपडी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तर पुनित वाधवानी याचे पुणे-सातारा रोडवर चारचाकी वाहनांचे शोरूम आहे. मनिल आणि पुनित हे एकमेकांच्या आहेत. ते 4 एप्रिल 2016 रोजी पिंपरी मधील मोरवाडी येथे आले होते. त्यावेळी पुनित याने शोरूममध्ये चारचाकी वाहनांचा स्टॉक भरायचा आहे आणि सध्या माझ्याकडे पैशांची अडचण आहे. स्टा ॅक भरण्यासाठी पुनित यांनी मनिल यांना 50 लाख रुपये मागितले. पैसे देण्यासाठी मनिल यांचा आणखी एक मित्र राजेश राजपाल याने आग्रह केला. त्यावरून मनिल पैसे देण्यास तयार झाले. त्याबदल्यात पुनित यांनी बिल ऑफ एक्सचेंज देण्याचे कबुल केले व घेतलेले पैसे ते सहा महिन्यांत परत करीत असल्याचे आश्वासन दिले.