Breaking News

स्नेहालय येथे भरतनाट्यम नृत्याविष्कार ‘अभंगरंग’ रविवार १० जूनला

नगर - ‘स्नेहालय मैत्रीणी मंडळ’ आयोजित ‘चीद्विलासीनी’ नृत्यालय व पदमश्री विजय भटकर मल्टीव्हर्सीटी प्रस्तुत भरतनाट्यम नृत्याविष्कार ‘अभंगरंग’चे रविवार १० जूनला स्नेहालय येथे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिनी आयुष्य जगत असताना या कामात परमेश्वर बघण्याची शिकवण भारतीय अध्यात्माने जगाला दिलेली देणगी आहे. संतांनी सहज सोप्या भाषेत हीच शिकवण अभंगातून दिली.

या अभंगांना दृश्यरूप देण्याचे काम ‘चीद्विलासीनी’ पुणे ,यांनी केलेले आहे.

जानपद भाषेतील अभंगरचनेची भरतनाट्यम नृत्यातील गुंफण असलेला हा कार्यक्रम स्नेहालायाच्या चिमुकल्यांसाठी रवीवार दि.१० जून रोजी स्नेहालय पुनर्वसन संकुल एम.आय.डी.सी. अहमदनगर येथे सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे.

या अभंगरंग कार्यक्रमाची संकल्पना व नृत्य दिग्दर्शन प्रज्ञा अगस्ती यांचे असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या नृत्याविष्कारास नगरकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रमा गुजर, राधा कुलकर्णी, अनघा बंदिष्टी, मुग्धा मुळे, लता वाघ, मनीषा गुगळे, डॉ.स्वाती घुले, अनिता माने ,रुपाली मुनोत,सपना आसावा यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर स्नेह्भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मनीषा गुगळे ९४२३१६३१७८ यांच्याशी संपर्क साधावा.