नाशिकमध्ये भीषण अपघातात पाच जण ठार
नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर बस आणि प्रवासी गाडीच्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तसेच, काही जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. नाशिकच्या पिंपळागावजवळ ही घटना घडली आहे. अपघाताचे कारण अद्याप कळले नसून बसचा टायर फुटल्याने ही घटना झाल्याचे म्हटले जात आहे. नाशिकहून नंदुरबारकडे ही बस जात होती. या बसचा टायर अचानक फुटल्याने एक धावती क्रूझर गाडी त्याबसवर आदळली. क्रूझरमधून जाणारे अपघातग्रस्त प्रवासी नाशिला एका कार्यक्रमासाठी येत असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातनंतर स्थानिक नागरिकांनी लगेच मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी रुग्णलयाकडे पाठवले. या अपघाताचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही. या प्रकरणी अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.