विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला निवडणूक
मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.केंद्रिय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
कॉग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, सु निल तटकरे, अमरसिंह पंडीत, शेकापचे जयंत पाटील, रासपचे महादेव जानकर,भाजपचे विजय गिरकर यांची मुदत येत्या 27 जुलैला संपत आहे. या रिक्त होणार्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलैला निवडणूक होत आहे.
केंद्रिय निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.त्यानुसार येत्या 28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून,6 जुलैला छाननी करण्यात येईल.9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी क रण्यात येईल.