‘आप’चा पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा केजरीवालांच्या समर्थनासाठी चार राज्याचे मुख्यमंत्री मैदानात
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वातावरण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. केजरीवाल यांच्या समर्थनासाठी चार राज्यांचे मुख्यमंत्री मैदानात उतरल्यामुळे आंदोलनाला धार चढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारला घेरण्यासाठी ’आप’ थेट पंतप्रधान कार्यालयावर रविवारी सांयकाळी 4 वाजता मोर्चा काढण्यात आला.
क ेंद्र सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याच्या आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री गोपाल राय व सत्येंद्र जैन हे आंदोलनात सहभागी आहेत. चार महिन्यांपासून कामे अडवून ठेवणार्या आयएएस अधिकार्यांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे चौघे दिल्लीत दाखल होत, नीती आयोगाच्या बैइकीच्या निमित्ताने त्यांनी पंतप्रधानांची भेट देखील घेतली.
केंद्र सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याच्या आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल आपल्या सहकारी मंत्र्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री गोपाल राय व सत्येंद्र जैन हे आंदोलनात सहभागी आहेत. चार महिन्यांपासून कामे अडवून ठेवणार्या आयएएस अधिकार्यांना संप मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
अरविंद केजरीवाल नक्षलवादी
भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांची जीभ घसरली.
राजधानी दिल्लीतील वातावरण मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनामुळे चांगलेच तापले आहे. ‘आप’ आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. केजरीवाल यांच्यावर टीका करताना भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री केजरीवाल नक्षलवादी असल्याचे वादग्रस्त विधान स्वामी यांनी केले
मुख्यमंत्री केजरीवाल हे नक्षलवादी आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला.