साईचरित्र पारायण सोहळा उत्साहात
कोपरगाव शहर प्रतिनिधी
येथील साईसमाधी शताब्दी वर्षानिमित्त संत बाळू काका महाराज प्रतिष्ठान व ओम साईराम ग्रुप यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेला श्रीसाई सच्चरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त साईकथाकार ह. भ. प. विकास महाराज गायकवाड यांच्या उपस्थितीत काल्याचे च्या किर्तन झाले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेत्रज्योत फाऊंडेशन आयोजित अहमदनगर आनंदऋषि नेत्रालय यांनी मोफत नेत्रबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा पंचकोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.