सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश
संगमनेर प्रतिनिधी
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परिक्षेत येथील सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा निकाल ९४. टक्के इतका लागला. यात विज्ञान शाखेचा निकाल ९९. १ टक्के, वाणिज्य शाखेचा १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ८०. ९ टक्के असा लागला.
सह्याद्री महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता जोपासली आहे.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सेक्रेटरी चंद्रकात कडलग, खजिनदार लक्ष्मणराव कुटे, शिवाजीराव थोरात, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, केशवराव मुर्तडक, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. के. दातीर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी. के. शिंदे, उपप्राचार्य सुधाकर उगले, उपप्राचार्य शिवाजीराव नवले, समन्वयक प्रा. के. ई. दिघे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाचालीस शुभेच्छा दिल्या आहे.