राजस्थान सरकारचा तुघलकी निर्णय सरकारी कर्मचार्यांच्या जीन्स अन् टी-शर्टवर बंदी
जयपूर - राजस्थानच्या कामगार विभागाने येथील सरकारी कर्मचार्यांसाठी एक आदेश काढला आहे. सरकारने सरकारी कर्मचार्यांच्या कपड्यांवर निर्बंध घालत असून, कर्मचार्यांना जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास बंदी घातली आहे. 21 जूनला येथील कामगार आयुक्त गिरीरीज सिंह कुशवाहा यांनी काढलेल्या या आदेशानुसार, काही सरकारी कर्मचारी हे कार्यालयांमध्ये जीन्स व टी-शर्ट घालून येतात किंवा अशोभनीय कपडे घालतात. त्यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलिन होते. हे कार्यालयाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे, असे आदोशात म्हटले आहे. मात्र, या निर्णयांनंतर राजस्थानच्या बहुतांश सरकारी कर्माचारी नाराज झाले आहेत. कर्मचारी संघटनेनेही या आदोशाला विरोध केला आहे. हा आदेश लोकशाहीच्या मुलभूत हक्कांविरोधी असल्याची टीका राजस्थान कर्माचारी महासंघाचे अध्यक्ष गजेंद्र सिंग राठोड यांनी केली आहे.