महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना जामीन
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना बुधवारी जामीन देण्यात आला. डी.एस.कुलकर्णींना कर्ज दिल्याप्रकरणी मराठेंना अटक करण्यात आली होती. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मराठेंना जामीन मंजूर झाला. पुण्याचा विशेष जिल्हा न्यायालयानं मराठेंना जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्यानंतर मराठे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मराठेंची पोलीस कोठडी सरेंडर करून न्यायालयीन कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती. मागच्या बुधवारी मराठेंना अटक झाली होती. रवींद्र मराठेंना अटक करण्यात आल्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेंनी सरकार आणि पोलिसांवर टीका केली होती. तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मराठेंच्या अटकेबाबत काहीही माहिती नाही म्हणणारे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. पीक कर्ज वाटपाच्या इनक्वायरीवर मराठे होते आणि त्यांनी यासगळ्या प्रकरणातला फोलपणा बाहेर काढला म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
नोटबंदीच्या काळात भाजप अध्यक्ष अमित शाह संचालक असलेल्या बँकेत जास्त नोटा बदलून देण्यात आल्या. वेणुगोपाल धूत यांना दिलेल्या कर्जामध्ये आयसीआयसीआयच्या चंदा कोचर यांचं नाव आलं. अमित शाह आणि चंदा कोचर यांच्यावर कारवाई होत नाही मग रवींद्र मराठेंना अटक कशी होते, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. बँक अधिकार्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप शरद पवारांनी पुण्यात केली. पुणे पोलिसांसह शरद पवारांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं.