Breaking News

एमआयएमची शहर कार्यकारिणी बरखास्त

वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा असा आरोप करत एमआयएमची शहर कार्यकारिणी बरखास्त करत असल्याचे पत्र शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी पक्षश्रेष्ठ पाठविले आहे. शहराध्यक्ष अकिल मुजावर, महासचिव शफीमुल्ला काझी, प्रवक्ते धम्मराज साळवे यांनी याबाबतचे राजीनामा पत्र आ. इम्तियाझ जलील यांना पाठविले आहे.

फेब्रुवारी 2017 च्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे 14 उमेदवार स्वबळावर दिले होते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी कार्यक्षमपणे लढतही दिली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी खा. असददुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा राज्य कोर कमिटीने नियोजित केली होती. या सभेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च करून नियोजन केले होते. मात्र ऐंनवेळी ही सभा रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिक तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा रोष आमच्यावर ओढला गेला. ही सभा रद्द झाल्यामुळे निवडणुकीवरही त्याचा परिणाम झाला,असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.