Breaking News

राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन ‘महाराष्ट्र माझा’ 20 डिसेंबर पर्यंत


नागपूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच बदलत्या महाराष्ट्राच्या वेद घेणाऱ्या राज्यातील छायाचित्रकारांनी साकारलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ हे राज्यस्तरीय छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक 20 डिसेंबर पर्यंत विनामुल्य सर्वांसाठी खुले राहणार आहे.
शासकीय मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) विधानभवनव्या मागील संग्रहालयाच्या कलादालनात राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विनामुल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सर्वांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले आहे.

महाराष्ट्र माझा ही छायाचित्र स्पर्धा माहिती व जनसंपर्क विभागाने राज्यस्तरावर आयोजित केली होती. या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त तसेच उत्कृष्ट छायाचित्रांमधून ‍निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. बैलगाडी शर्यतीतील महिला, सावित्रीच्या लेकी, बेटी बचाव-बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा, पर्यटन, सांस्कृतिक परंपरेचे प्रदर्शन या छायाचित्रांमधून घडत असून या छायाचित्रांना मान्यवर, नागरिकांची दाद मिळत आहे.