Breaking News

अहमद पटेल यांनाच राष्ट्रवादीचा पाठिंबा : तारिक अन्वर

अहमदाबाद, दि. 08, ऑगस्ट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमद पटेल यांच्याच पाठीशी उभा आहे. राष्ट्रवादीची दोन्ही मतं काँग्रेसला पडणार आहे, असा दावा ज्येष्ठ नेते  तारीक अन्वर यांनी केला आहे. गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीत ‘पक्षाने भाजपला मतदान करायला सांगितलं आहे,’ असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे. त्यावर आमचा पाठिंबा अहमद पटेल यांनाच असल्याचं तारीक अन्वर यांनी स्पष्ट केलं.
गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना, कंधल जाडेजा यांचं वक्तव्य काँग्रेसच्या  अहमद पटेल यांना मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात होतं. तर राष्ट्रवादी आपल्यालाच पाठिंबा देईल, असा विश्‍वास अहमद पटेल यांनी व्यक्त केला आहे. अहमद  पटले हे सोनिया गांधींचे विश्‍वासू आणि स्वीय सचिव आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाल्यावर अंतिम निकाल हाती येतील.
दरम्यान, भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपाने तिसरा उमेदवार रिंगणात  उतरवून भाजपने अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे.