Breaking News

शिवधनुष्य प्रतिष्ठानचा शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा यंदा 24 मे- 6 जून दरम्यान


पुणे,दि. 23 : शिवधनुष्य प्रतिष्ठानतर्फे सुर करण्यात आलेला शिवनेरी ते रायगड पायी पालखी सोहळा यंदा 24 मे ते 6 जून कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.265 किलोमीटर अंतराच्या या पालखी सोहळ्यादरम्यान वाढते तापमान प्रदुषण यावियी जनजागृती केली जाणार आहे त्याचबरोबर पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित या पालखी सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्षे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणे,शिवचरित्राचा प्रसार करणे महाराजांनी केलेला पराक्रम रयतेसाठीचे कार्य विविध योजना तसेच शहाजी महाराज संभाजी महाराज,राजाराम महाराज आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले वीर यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जाते अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यापायी पालखी सोहळ्याला 24 मे रोजी शिवनेरी गडावरुन सुरुवात होणार आहे.गडावर सकाळी साडेआठ वाजता शिवजन्मस्थळी राजांच्या मुर्तीची आरती केली जाणार आहे. पुण्यात 28 मे यादिवशी लाल महालात पालखीचे आगमन होणार आहे.मर्दानी खेळ आणि शस्त्र रिंगण करुन राजांना मानवंदना दिली जाणार आहे.29 मे या दिवशी पालखी मुक्कामी राहणार आहे यादिवशी पुरस्कार वितरण व्याख्यान आणि 51 बालशाहिरांचे पोवाडे असे कार्यक्रम होणार असल्याचे ही कालेकर यांनी सांगितले.