Breaking News

शेतकरी सहकारी संघाला चांदीचे पदक


कोपरगाव शहर प्रतिनिधी 
येथील शेतकरी सहकारी संघाला सर्वाधिक बियाणे विक्रीबददल महाबीजचे दुस-या क्रमांकांचे चांदीचे पदक मिळाले आहे. अध्यक्ष संभाजीराव गावंड, उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी हे पदक स्विकारले. याबद्दल संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी शेतक-यांच्या सोयी सुविधेसाठी सातत्यांने काम करून बहुतांश योजना राबविल्या आहेत. सन २०१६-१७ मध्ये राज्यात शेतकरी सहकारी संघ कोपरगांवने सर्वाधिक महाबीजचे बियाणे विक्री केले. त्याबद्दल या संघाला व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकश देशमुख यांच्या हस्ते राज्यस्तरावरील दुस-या क्रमांकाचे चांदीचे पदकाचे बक्षिस देण्यात आले.

याप्रसंगी संचालक विवेक कोल्हे, अंबादास देवकर, चंद्रकांत देवकर, नानासाहेब गवळी, चांगदेव आसने, कल्याण चांदगुडे, मच्छिंद्र लोणारी, बबनराव निकम, विजय रोहोम रघुनाथ फटांगरे, छबुराव माळी, विश्वासराव गाडे, सुभाष गायकवाड, अरूण भिंगारे राजेश कदम, मधुकर, उगले, संजय भाकरे, शिवाजीराव कदम, बाजीराव मांजरे, लक्ष्मीबाई थोरात, यमुनाबाई बढे आदी उपस्थित होते. व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी आभार मानले.