Breaking News

विकासप्रक्रियेत मागे पडणार नाही : विखे


खासदार साहेबांनी {स्व. बाळासाहेब विखे } केलेल्‍या वैचारिक संघर्षामुळे प्रवरा परिसर उभा राहिला. त्‍यांच्‍या विकासाच्‍या विचाराला समृध्‍द करतानाच भूमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्‍यातील सामाजिक परिवर्तनाच्‍या संघर्षास कटिबद्ध व्‍हावे लागेल. येणा-या काळात राजकीय, सामाजिक आव्‍हानं मोठी असली तरी, विकासाच्‍या प्रक्रियेत आपण कुठेही मागे राहणार नाही, असा विश्‍वास विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी व्यक्त केला. 

विरोधी पक्षनेते विखे यांच्‍या वाढदिवसाचे औचित्‍य साधून प्रवरा परिवाराच्‍यावतीने डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अभिष्‍टचिंन सोह‍ळ्याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास माजीमंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के, आ. भाऊसाहेब कांबळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे, जिल्‍हा कॉंग्रेसचे अध्‍यक्ष अण्‍णासाहेब शेलार, चेअरमन डॉ. सुजय विखे, श्रीरामपुरच्‍या नगराध्‍यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्‍यक्ष करण ससाणे, नवी मुंबईचे उपमहापौर म्‍हात्रे, सभापती हिराबाई कातोरे, अंबादास पिसाळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वाय. एम. जयराज, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्‍यक्ष भागवत देवसरकर, सचिन गुजर, शिवाजीराव गाडे, बापुसाहेब गुळवे आदी उपस्थित होते. प्रवरा परिवाराच्‍यावतीने विखे यांचा याप्रसंगी सत्‍कार करण्‍यात आला.

प्रारंभी युवानेते डॉ. सुजय विखे यांनी प्रास्‍ताविक केले. याप्रसंगी माजीमंत्री म्‍हस्‍के यांनी‍ मनोगत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी राज्‍यासह जिल्‍ह्यातून विविध संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 

**