Breaking News

समाजकार्याचा कोते हे दीपस्तंभ : देशमुख


कोतूळ प्रतिनिधी 
येथील सेवाभावी व्यक्तिमत्व सुरेश कोते हे एक सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व आहे. निर्व्यसनी आणि शिस्तबध्द राहून त्यांनी आपले स्वतःचे जीवन घडविले. लिज्जत पापड, पुणेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी आपल्या कर्तव्य दशेतून कामाचा वेगळा ठसा उमटविला, असे प्रतिपादन जयराम देशमुख यांनी केले. 

ते म्हणाले, प्रवरा नदीच्या मेहेंदुरी पुलावर तोल जाऊन चार माणसे नदीत बुडायला लागली. शंकर संगारे नावाच्या तरुणाने या चौघांना वाचविले. ही बातमी जेव्हा सुरेश कोते यांना समजली, तेंव्हा कोते यांनी ११ हजार रूपये देऊन शंकर संगारे या तरूणाच्या जिगरबाजीचा गौरव केला. अनेक विद्यार्थी कोते यांच्या आशिर्वादामुळे घडले आहेत. स्वतःचा सत्कार किंवा गौरव कोते यांनी कधीच करून घेतला नाही. उलट समाजातील गुणवंतांच्या सन्मानासाठी पुरस्कारासाठी ते नेहमीच सर्वांच्या पुढे राहिले आहेत. कोतुळ गावच्या विकासात आणि सामाजिक सद्भावनेत कोते यांचे योगदान हे हिमालयाच्या पर्वताएवढे आहे.