Breaking News

विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट : क्यातनवार


कोपरगाव शहर प्रतिनिधी
येथील संजीवनी एम. बी. ए. च्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत आठ विध्यार्थ्यांना नव्याने नामांकित कंपन्या व बॅंकेत नोकऱ्यांसाठी निवड झाली. आजअखेर ७० टक्के विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. यापुढेही मोहिम सुरु राहणार असून शंभर १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे उद्दिष्ट एम. बी. ए. विभागाने ठेवले आहे, अशी माहिती प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार यांनी दिली.

दरम्यान, संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या आठही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच एम. बी. ए. विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर आणि ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. वाय. एल. आहेर यांचेही अभिनंदन केले आहे. या आठ विद्यार्थ्यांमध्ये ओम लाॅजिस्टीक या कंपनीने वार्षिक पॅकेज ३ लाख रुपये देत रविंद्र अव्हाटेची निवड केली. जीफआय इन्फर्मेटीक या कंपनीने पुजा बेलूरे व अनुजा कुलट यांची निवड केली. एच. डी. एफ. सी. बॅंकेने अमोल इंगळे, अमोल पवार व अपेक्षा पांडे यांची निवड केली. डी मार्ट या कंपनीने प्राजक्ता भालेराव व गौरव घुमरे यांची निवड केली आहे. कंपन्या व बँकेने देऊ केलेले वार्षिक पॅकेज हे प्रशिक्षण काळातील असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुन्हा पॅकेज वाढणार आहे. 

संजीवनीच्या एम. बीए., इंजिनिअरींग, फार्मसी व पाॅलिटेक्निक या संस्थांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असल्याने पालंकामध्ये संजीवनीचे आकर्षण वाढत आहे. विद्यार्थी व पालकांची धावपळ होऊ नये, त्यांना एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी, विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात मिळणाऱ्या नोकऱ्या अथवा स्वयंरोजगाराच्या संधी, जाती संवर्गानिहाय मिळणाऱ्या शिष्यवृत्या, शैक्षणिक कर्ज सुविधा आदी बाबींची माहिती देण्यासाठी व्यवस्थापनाच्या संकल्पनेतून ‘संजीवनी’मध्ये प्रवेश माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन डाॅ. क्यातनवार यांनी केले आहे.
मृगाने मुहूर्त साधला!