कोहोकडी परीसराच्या विकासासाठी भरीव निधी : विजय औटी
पारनेर / प्रतिनिधी ।
कोहोकडी गाव व परीसराच्या विकासासाठी आगामी काळात भरीव निधि उपलब्ध करुण दिला जाईल अशी ग्वाही आ. विजय औटी यांनी कोहोकडी ग्रामस्थांना दिली. कोहोकडी येथील धनगरवस्ती रस्त्यावर सुमारे 21 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या, मोरी पुलाचा लोकार्पण सोहळा आ. विजय औटी यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कोहोकडीचे सरपंच डॉ. साहेबराव पानगे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जि.प. सदस्य काशिनाथ दाते, पं.स. सदस्य गणेश शेळके, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे उपस्थित होते.
यावेळी आ. औटी म्हणाले की, कोहोकडी गावातील स्थानिक कार्यकर्त्यांना तालुका स्तरावर काम करण्याची संधी दिली होती. त्यांनी पदाच्या माध्यमातुन कामे केली नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी सत्तेच्या बाहेर ठेवत, त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यात कोहोकडीत पद असल्याने माझेही दुर्लक्ष झाले होते. आता मात्र सरपंच डॉ. साहेबराव पानगे यांनी गावातील समस्या मांडल्या आहेत, त्या समस्या व स्थानिक विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. ग्रामस्थांनी पुलासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती. त्याची त्वरित दखल घेत 21 लाख रुपये निधि उपलब्ध करत, हे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण केले आहे. साहेबराव पानगे हे सुशिक्षित सरपंच असुन त्यांनी, नागरिकांच्या हिताच्या समस्या मांडल्या असुन, त्या समस्या व इतर विकास कामासाठी पुढील काळात निधी उपलब्ध करुण दिला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी उपसरपंच सरुबाई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या सोनिया गायकवाड, सोमनाथ गायकवाड, माजी सरपंच जयवंत गायकवाड, माजी उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, माजी उपसरपंच दशरत टोणगे, विशाल गायकवाड, डॉ. महिंद्रा पानगे, सतिष गोगडे, आनंद चाबुकस्वार, राजू कर्हे, सविता टोनगे, सोनाली चौधरी, बापु टोनगे, सतिष थोरात, नामदेव गोगडे, भाउ घावटे, रामदास घावटे, रामदास कर्हे, बापु टकले, जालिंदर ढवन, पाराजी ढवन, संपत चाबुकस्वार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.