Breaking News

दुहेरी हत्याकांड प्रकरणी पिस्तूल विकणारा ताब्यात


जामखेड / श. प्रतिनिधी । 
येथील दुहेरी हत्याकांडातील पिस्तूल विक्री करणार्‍या विनोदकुमार सोमरीया उर्फ अंग्रेजबाबा (वय 42) रा. अांबेडकर नगर सेंदवा, जि. बडवानी यास जामखेड पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथून रात्री ताब्यात घेतले. 
दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड यास शस्त्र पुरवणारा आरोपी याने दुहेरी हत्याकांडात पिस्तूल पुरवले असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सदरचे पिस्तूल मुख्य आरोपी गोविंद गायकवाड यास विकले होते. व याच पिस्तूलातुन गोविंद गायकवाडने मयत योगेश राळेभात याच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांना तपासात फक्त विनोद असे नाव माहीत होते मात्र, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक घनशाम पाटील, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, यांच्या सुचनेवरून पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, यांना मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, शेळके पो.कॉ गणेश गाडे, बेलेकर यांचे एक पथक तयार करून तपासाच्या योग्य सूचना देवून पोलिस पथक मध्यप्रदेश येथे पाठवण्यात आले. या ठिकाणी पोलीसांनी तीन दिवस तपास करुन दि. 29 रोजी यातील पिस्तूल विक्री करणार्‍या विनोदकुमार सोमरीया उर्फ अंग्रेजबाबा रा.अंबेडकर नगर, सेंदवा, जिल्हा बडवानी, या ठिकाणाहून ताब्यात घेऊन सकाळी जामखेड पोलिस स्टेशनला आणण्यात आले.