Breaking News

रविवारी वडनेर हवेली येथे अंगणवाडी रंगकाम, डिजिटल लोकार्पण सोहळा


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे रविवारी दि. 1 जुलै रोजी सकाळी 8 वाजता अंगणवाडी रंगकाम व डिजिटल लोकार्पण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन जाणीव फाऊंडेशन व वडनेर हवेली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 
जाणीव फाऊंडेशनमार्फत अनेक उपक्रम वर्षभरात राबविले जातात. त्याचप्रमाणे रविवारी गावातील अंगणवाडीचे जाणीव फाऊंडेशन मार्फत करण्यात आलेले रंगकाम व जिल्हयातील पहिली डिजिटल अंगणवाडी लोकार्पण सोहळा, गावातील ग्रामस्थांना वृक्षवाटप समारंभ, सन 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या वडनेरकरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा, एम.पी.एस.सी परिक्षेमध्ये यश प्राप्त केलेल्या वडनेरकरांचा गौरव, 10 वी व 12 वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून 70 किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून, त्यांचा गुणगौरव, जि.प शाळा वडनेर हवेली शाळेतून बदली झालेल्या व नव्याने रूजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ होणार असून हा कार्यक्रम ग्रामस्थ वडनेर हवेली, जाणीव फाऊंडेशन यांच्या वतीने होणार आहे.
कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.